नरेश रतन मणेरा

नरेश रतन मणेरा

शिवसेना नगरसेवक, प्रभाग क्र. १ (क) ठाणे महानगरपालिका, ठाणे

महाविद्यालय जीवनापासून तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख व स्व. आनंद दिघेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिवसैनिक म्हणून सामाजिक व राजकीय कारकीर्दीस प्रारंभ.

ठाणे महानगरपालिकेच्या सन १९८६ च्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २ मधून शिवसेना नगरसेवक म्हणून विजयी. सन १९८७-८८ सालाकरिता ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून निवड.

सन १९९७-२००२ पर्यंत ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेतर्फे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड. तसेच ठाणे महापालिकेतील शिवसेना गटाचा प्रतोद म्हणून निवड.

सन २००२ मध्ये वाघबीळ, घोडबंदर रोड, ठाणे याठिकाणी वैष्णवी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून नागरिकांना बँकिंग सेवा, बेरोजगारांना कर्जपुरवठा तसेच तीन संगणकीकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु केली.

२०१२ साली झालेल्या ठाणे पालिका सार्वत्रिक निवडणुकीत पुनःश्च शिवसेना नगरसेवक म्हणून विजयी.

२०१२-२०१४ कालावधीत ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी निवड.

२०१५-२०१६ कालावधीत ठाणे महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती पदी निवड.

२०१७ च्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत पुनःश्च प्रभाव क्र. १ 'क' मधून विजयी.

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी निवड......

विकास कामे

घोडबंदर रोड विभागातील पांचवडपाडा नाल्यावर पूल बांधण्याच्या कामास प्रारंभ

 ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्र. १ मधील पांचवडपाडा नाल्यावर पूल बांधण्याच्या कामाचा शुभारंभ आज माजी उपमहापौर आणि स्थानिक शिवसेना नगरसेवक नरेश मणेरा यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला. स्थानिक शिवसेना नगरसेवक नरेश मणेरा यांनीच यासाठी प्रशासनाकडे यशस्वी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. घोडबंदर रोड विभागातील पांचवडपाडा हे प्रामुख्याने आदिवासी लोकांची वस्ती असलेले गाव असून येथील नाल्यावर यापूर्वी बांधलेला छोटा पूल आता जुना व नादुरुस्त झालेला आहे. तसेच हा पूल छोटा व अरुंद असल्याने त्यावरून वाहने जात नव्हती आणि पावसाळ्यातही लोकांना नाल्याच्या प्रवाहातून गावात ये-जा करावी लागत होती. त्यामुळे ही गंभीर परिस्थिती लक्षांत घेऊन आपण येथील आदिवासी नागरिकांच्या सोयीसाठी पांचवडपाडा नाल्यावर वाहने येऊ-जाऊ शकतील इतका रुंद पूल बांधण्यासाठी प्रशासनाकडे प्रयत्न व पाठपुरावा केला होता अशी माहिती यावेळी नगरसेवक नरेश मणेरा यांनी यावेळी दिली. पांचवडपाडा नाल्यावरील या पुलासाठी सुमारे २५ लाख इतका खर्च येणार असून हा पूल बांधून पूर्ण झ


कासार वडवली येथील ठामपा शाळा क्र. ६२ जवळील पायवाटा तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ

ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र.१ मधील कासार वडवली येथील ठामपा शाळा क्र. ६२ जवळील पायवाटा तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ करतांना माजी उपमहापौर आणि स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा, आरोग्य समितीच्या सभापती सौ.नम्रता घरत, शिवसेना नगरसेविका सौ. साधना जोशी, उपविभागप्रमुख मया पाटील, अकबर शेख, राजेंद्र जोशी, महादेव राऊत, शाखाप्रमुख शिवाजी शिंदे, जयवंत म्हात्रे, मंगेश कदम, ज्ञानेश्वर पाटील, अजय तलवंदे, संदीप कदम, संदीप मणेरा, रवी घरत, योगेश पाटील, भारत शेळके, सुनील भोईर, बालन, रोहिणी ठाकूर, निर्मला कांबळे, सागर मोहिते, गुरुदेव पाटील, गोपाळ शेट्टी, रवी शिंदे, विनोद बावस्कर, प्रेम शेळके तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


क्षणचित्रे
आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर